जळगाव शहरात साईनगरमधील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : एमआयडीसीतील साईनगरमध्ये तरुणाचे बंद घराचा दरवाजा उघडून घरातून २० हजार रूपये किंमतीचे दोन महागडे मोबाईल चोरून नेल्याची घटना रविवारी २० एप्रिल रोजी पहाटे ५ वाजता समोर आले आहे. जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामेश्वर गब्रू पवार (वय-२५, रा. साईनगर, एमआयडीसी, जळगाव) हा तरुण काही मित्रांसह खोली घेऊन राहत आहे. खाजगी कंपनीत काम करून तो उदरनिर्वाह करतो. दि. १९ एप्रिल ते २० एप्रिलच्या दरम्यान मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेऊन घरातून २० हजार रुपये किमतीचे २ महागडे मोबाईल चोरून नेले. ही घटना रविवारी २० एप्रिल रोजी पहाटे ५ वाजता समोर आली. या संदर्भात रामेश्वर पवार यांनी एमआयडीसी तक्रार दिली आहे. त्यानुसार रात्री ८ वाजता अज्ञात चोरट्यांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रामकृष्ण पाटील करीत आहेत.