भुसावळ शहरातील मोठ्या पोस्ट ऑफिसजवळील घटना
भुसावळ ( प्रतिनिधी ):- शहरातील मोठ्या पोस्ट ऑफिसजवळ घरफोडीची घटना घडली असून अज्ञात चोरट्यांनी तब्बल पाच लाखांचा ऐवज लंपास केल्याची माहिती मिळाली आहे. भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना २४ ऑक्टोबर रोजी पहाटे ३.३० ते ५ या वेळेत घडली. प्रशांतसिंह ठाकुर (वय ४६) यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला व सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोकड असा ऐवज चोरून नेला. चोरट्यांनी घरातून सोन्याचे मंगळसूत्र (३ तोळे), सोन्याच्या अंगठ्या (३ नग, प्रत्येकी ५ ग्रॅम), चांदीचे कडे (सुमारे १० ग्रॅम), सोन्याची नाकफुल (१ ग्रॅम) आणि रोख रक्कम ८ हजार रुपये असा ऐवज लंपास केला असल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.









