धरणगाव तालुक्यातील चिंचपूरा येथील घटना
धरणगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील चिंचपुरा येथे घरफोडी करीत अज्ञात चोरट्याने रोकड, सोन्याचे दागिने मिळून ३९ हजार ५०० रुपयांचा ऐवज लांबवला. याप्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
नीळकंठ विश्वनाथ कोळी (३०) हे आपल्या परिवारासह चिंचपुरा येथे वास्तव्यास आहेत. ३० डिसेंबर रोजी रात्री ९ ते ३१ डिसेंबरच्या पहाटे साडेपाच वाजेच्या दरम्यान, कोळी यांच्या नव्या घराच्या मागील दरवाजाचा कडी- कोंडा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील २५ हजारांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा एकूण असा ३९ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी धरणगाव पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार विजय चौधरी करीत आहेत.