जळगाव शहरातील टॉवर चौकातील मुख्य रस्त्यावर घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील टॉवर चौकातील मुख्य रस्त्यावर पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील १० हजार ५०० रूपये किंमतीची सोन्याचे मंगळसुत्र दुचाकीवर आलेल्या अज्ञात चोरटयांनी जबरी हिसकावून चोरून नेल्याची घटना दि. २८ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता घडली आहे. याप्रकरणी सोमवारी ४ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना हि शहर पोलीस स्टेशनच्या जवळच घडली असल्याने आता चोरट्याना पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे दिसून येत आहे.
प्रणिता उमेश वाणी (वय २४ रा. वाणी गल्ली, जळगाव) ही महिला दि. २८ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास ते जळगाव शहरातील टॉवर चौकातील मुख्य रस्त्यावरून पायी जात होत्या. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील १० हजार ५०० रूपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र ओढून चोरून नेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर महिलेने आरडाओरड केली तोपर्यंत चोरटा दुचाकीवरून पसार झाला होता. महिलेने याबाबत जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सोमवारी ४ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढीलतपास पोहेकॉ प्रदीप पाटील हे करीत आहे.