भुसावळ तालुक्यातील फेकरी येथील घटना
भुसावळ (प्रतिनिधी) : तालुक्यातील फेकरी शिवारातील कृषी संजीवनी शेतकरी गटाच्या कार्यालयातून अज्ञात चोरट्यांनी सुमारे १८ हजारांचा धान्य साठा लांबवला. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अतुल अशोक कवठे (४४, फेकरी, ता.भुसावळ) यांच्या फिर्यादीनुसार, फेकरी शिवारात दीपनगर हायवे रोडलगत कृषी संजीवनी शेतकरी गटाच्या कार्यालयातून १४ हजार ८५० रुपये किंमतीचा ५४० किलो गहू, ३ हजार रुपये किंमतीचे शिलाई मशीन असा एकूण १७ हजार ८५० रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबवला. तपास हवालदार प्रेमचंद सपकाळे करीत आहेत.