जळगाव तालुक्यात धानवड येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील धानवड गावात राहणाऱ्या किराणा दुकानदाराचे बंद घर फोडून घरातून सोन्याचे दागिने आणि ४० हजारांची रोकड असा एकुण ६६ हजार रूपये किंमतीचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना रविवारी २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता समोर आली आहे. याबाबत रात्री ११ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिकन शंकर पाटील (वय ६२) हे कुटुंबियांसह धानवड गावात वास्तव्याला आहेत. किराणा दुकान चालवून ते उदरनिर्वाह करतात. दि. २३ ऑक्टोबर ते २६ ऑक्टोबर दरम्यान ते कुटुंबासह देवदर्शनासाठी जेजूरी येथे गेले होते. त्यावेळी त्यांचे घर बंद असल्याचा फायदा चोरट्यांनी घेतला. चोरट्यांनी त्यांच्या घराची स्लायडींग खिडकीचे कुलूप तोडून आत प्रवेश करत घरातून ४० हजार रूपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा एकुण ६६ हजार रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार रविवारी २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता वाजता समोर आला आहे. याप्रकरणी भिकन पाटील यांनी एमआयडीसी पोलीसात फिर्याद दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ मुकुंद पाटील हे करीत आहे.









