जळगाव (प्रतिनिधी ) – येथील एमआयडीसी परिसरातील एका कंपनीतून १४ हजार रुपयांचे साहित्य लांबविणाऱ्या चोरट्याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे .
एमआयडीसी परिसरातील श्रीराम पॉलिमर्स या कंपनीत १३ हजार ६०० रुपये किंमतीच्या विविध साहित्यांची चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला पोलीसांनी मंगळवारी ८ फेब्रुवारी रोजी अटक केली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.उमेश उर्फ साई सोनाजी आटे रा. सुप्रिम कॉलनी जळगाव असे या चोरट्याचे नाव आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, एमआयडीसीमध्ये व्ही सेक्टर येथे श्रीराम पॉलीमर्स हि चटई कंपनी निकीता राजेंद्र महाजन (वय-१९) रा. मेहरूण यांची आहे. आहे.
१७ जानेवारी रोजी कंपनीतून पाण्याची मोटर, शिलाई मशीन, दाणा मशिनचे दोन कटर, १०० मीटर वायर, दाणा मशिनला आवश्यक असणाऱ्या तिन पुली असा एकुण १३ हजार ६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरी नेल्याचे २० जानेवारी रोजी लक्षात आल्याने याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आरोपी उमेश उर्फ साई सोनाजी आटे रा. सुप्रिम कॉलनी जळगाव हा एमआयडीसी परिसरात असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, मिलींद सोनवणे, विकास सातदिवे, हेमंत कळसकर, सुधीर साळवे, योगेश बारी यांनी मंगळवारी ८ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता अटक केली. संशयित आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्यावर यापुर्वी वेगवेगळे सात गुन्हा दाखल आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक विकास सातदिवे करीत आहे.