खिर्डी ता.रावेर (प्रतिनिधी) येथून जवळच असलेल्या रावेर तालुक्यातील भामलवाडी येथील शेतकरी गुलाब मिठाराम पाटील यांच्या मालकीच्या १,३०,००० रू किमतीच्या म्हशी अज्ञाताने चोरून नेली.
खिर्डी रस्त्यावर असलेल्या गट नं १८९ या शेताच्या बांधावर गोठा बांधला असून गोठ्यात ३म्हशी,१पारडू, १वासरु अशी गुरे गोठ्यात बांधलेली होती.२७ जानेवारी रोजी रात्री८ वाजता तक्रारदार व मुलगा घनश्याम गुलाब पाटील यांच्यासोबत गुरांना चारा पाणी करून घरी परत आले . २८जानेवारी रोजी सकाळी ६वाजेच्या सुमारास माझे दोन्ही मुल घनश्याम व मोहन पाटील हे म्हशीचे दूध काढण्यासाठी गोठ्यात गेले असता त्यांना तिथे बांधलेल्या म्हशी दिसून आल्या नाही . याबाबत अज्ञात चोरट्याविरुद्ध निंभोरा पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निंभोरा पो स्टे. स.पो.नि.स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास एएसआय. राजेंद्र पाटील व त्यांचे सहकारी करीत आहे.