पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते वाटप
जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्ह्यामधील गहाळ झालेले किंवा चोरीला गेलेले ६२ मोबाईल ज्यांची किंमत १२ लाख ५० हजार रुपये आहेत. यांचा शोध घेऊन ते मोबाईल धारकांना आज पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते परत देण्यात आले.
जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणाहून व बाजारातून महागडे मोबाईल व गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्याकरिता पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी व अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतिष गोराडे, व पोलीस उपनिरीक्षक गणेश अहीरे यांना आदेशित केले होते. त्यानुसार सायबर पोलीस स्टेशन, जळगाव येथील किरण वानखेडे, हेमंत महाडिक, सचिन सोनवणे, पंकज वराडे, गौरव पाटील, मिलींद जाधव, दिपक पाटील जळगाव पो.स्टे असे पथक तयार करुन मिसींग मोबाईल शोध घेण्याची मोहीम राबविण्यात आली होती. सदर मोहीमेत जळगाव जिल्ह्यातील गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध महाराष्ट्र व इतर राज्य अशा वेगवेगळया ठिकाणी जावून एकूण १२ लाख ५० हजार रुपयाचे ६२ मोबाईल हस्तगत करण्यात आले, त्या सर्व मोबाईलचे १८ रोजी मोबाईल मालकांना पोलीस अधिक्षक जळगाव येथे वाटप करण्यात आले आहे.