सात संशयित चोरट्यांना केली अटक
जळगाव (प्रतिनिधी) – जामनेर शहरातील गिरीजा कॉलनीत वृद्ध दाम्पत्याच्या घरून धमकी देत ८ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेलेल्या ७ संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ६ लाख ६६ हजार ८६२ रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला असून तो जामनेर पोलिसांकडून फिर्यादी वृद्ध दाम्पत्यास परत देण्यात आला आहे.
येथील गिरीजा कॉलनीत राहणारे बळीराम माळी व त्यांच्या पत्नी सुशिलाबाई हे वृद्ध दाम्पत्य घरात असताना ८ मे २०२० रोजी संशयित ७ आरोपींनी त्यांना धमकी देत त्यांच्याकडील सोनेचांदीचे दागिने व रोख रक्कम असा ८ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रताप इंगळे व सहकाऱ्यांनी तपास सुरु केला होता. याप्रकरणी आकाश उर्फ चॅम्पियन शाम इंगळे रा. भुसावळ, अमोल एकनाथ वाघ, रा. तोंडापूर, वसीम अहमद पिंजारी रा. मच्छी मार्केट, भुसावळ, जितू उर्फ जितेंद्र किसन गोडाले रा. भुसावळ, सद्दाम शेख यासिन रा. जामनेर, सय्यद मोईजोद्दीन उर्फ पुतळ्या सय्यद मोकिमुद्दीन, शेख वसीम शेख कबिरोद्दीन दोन्ही रा. जामनेर यांना जामनेर पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्याकडून ६ लाख ६६ हजार ८६२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्या आला आहे. हा मुद्देमाल फिर्यादीस ताब्यात देण्यात आला आहे.
तपासात पोनी प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि धरमसिंग सुंदरडे, रियाज शेख, रमेश कुमावत, योगेश महाजन, अमोल घुगे, सोनसिंग ढोबाळ, राहुल पाटील, निलेश घुगे, तुषार पाटील यांनी महत्वाची कामगिरी बजावली.