चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनची कारवाई
चाळीसगाव (प्रतिनिधी) : चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी चोरीच्या मोटरसायकलीसह ११ पाणबुडी इलेक्ट्रिक मोटारी जप्त करत तिघा संशयितांना अटक केली आहे. गेल्या दीड वर्षात पाणबुडी मोटारी चोरून विकल्याचे माहिती तपासात मिळाली आहे.
पोलिसांनी दुचाकी चोरीच्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित सोमनाथ रघुनाथ निकम (वय २८, रा. अंधारी), सुधीर नाना निकम (वय २९, रा. महारवाडी, सध्या रा. आनंदवाडी, नांदगाव), सम्राट रवींद्र बागुल (वय २६, रा. महारवाडी) या तिघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली असून ती हातगाव ता. चाळीसगाव येथून हस्तगत करण्यात आली. तपासात उघड झाले की, आरोपींनी गेल्या दीड वर्षांत शेतकऱ्यांच्या पाणबुडी मोटारी चोरून विकल्या होत्या.
पोलिसांनी एकूण ११ पाणबुडी इलेक्ट्रिक मोटारी आणि एक दुचाकी असा एकूण १ लाख २४ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात काही गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, पोलीस कर्मचारी महेश पाटील, सागर पाटील, भूषण शेलार, तसेच चापोकॉ. बाबासाहेब पाटील यांनी केली.