जळगाव ( प्रतिनिधी ) – चोरीची मोटारसायकल खरेदी करणाराला अटक करून पोलिसांनी आज न्यायालयात हजर केले . पोलिसांनी आरोपीच्या १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीची मागणी केली आहे .
या गुन्हयातील फिर्यादी संदीप हीरामन कोळी यांनी पोलिसांना माहिती दिली की , अर्जुन भगीरथ पवार ( वय 22 , रा – प्लॉट भाग पाण्याचा टाकिजवळ धानवड ता – जळगाव ) हा चोरीस गेलेली हीरो होंडा कंपनीची मोटारसायकल ( क्र. एमएच 19 यु 6460 ) वर रायपुर कुसुंबा ( ता – जळगाव ) येथे फिरताना पकडले आहे . पोलिसांनी तेथे जाऊन अर्जुन पवार यास मोटारसायकलसह ताब्यात घेतले पोलीस ठाण्यात विचारपुस केली त्याने ही मोटारसायकल सुनिल अनिल बारेला ( रा. नशिराबाद ) याचेकडुन मोटारसायकल चोरीची आहे हे माहीत असुनसुध्दा विकत घेतली असल्याचे सांगितले. त्याची अटकपूर्व वैदयकिय तपासणी करून अटकेबाबत त्याची आई निर्मला पवार यांना माहिती देण्यात आली गुन्हयाचा तपास करणे असल्याने आरोपीला 14 दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याची मागणी न्यायालयात करण्यात आली आहे.