जळगाव ( प्रतिनिधी ) – आसोदा येथे घरासमोरुन २० हजार रुपये किंमतीची मोटारसायकल चोरीप्रकरणी जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
आसोदा येथे हंसराज सदू जाधव ( वय ६० ) हे वास्तव्यास आहेत. १९ मे रोजी हंसराज जाधव यांनी नेहमीप्रमाणे त्यांची एम.पी.६८, एम.एफ. ०२६७ या क्रमाकांची मोटारसायकल घरासमोर उभी केली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी मोटारसायकल दिसून आली नाही. सर्वत्र शोध घेवूनही मोटारसायकल मिळून न आल्याने हंसराज यांनी शुक्रवारी तालुका पोलिसात तक्रार दिली. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पो ना ज्ञानेश्वर कोळी हे करीत आहेत.