पहूर (प्रतिनिधी) – बसस्थानकसमोरील कृषी पंडित कॉम्प्लेक्समधील मुळचंद चोरडिया यांच्या स्वामी समर्थ प्रोव्हिजनचे शटर तोडून चोरांनी 5 हजार रुपयांची रोकडसह 13 हजार रुपयांचे किराणा सामान चोरून नेले ही चोरी आज सकाळी दुकान उघडण्यासाठी आल्यावर उघडकीस आली चोरीची माहिती पोलिसांना देण्यात आल्यावर पोलिसानी पाहणी केली दुकानातील ड्रॉवर खुले दिसून आले. कागदपत्र देखील अस्ताव्यस्त दिसून आले.

दुकानातील मालाची तपासणी केली असता दुकानातील गावरानी तुपाचे डब्बे, तेल पाउच, काजू, बदाम, व्हील, लक्स, डव साबण, पाउडर तसेच किरकोळ वस्तू चोरट्यांनी लंपास केल्याचे आढळून आले आहे.
अज्ञात चोरट्याविरुद्ध पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला तपास पो नि किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय बनसोड , ज्ञानेश्वर ठाकरे व सहकारी करीत आहे .







