चाळीसगाव शहरात बागवान गल्लीतील घटना
चाळीसगाव (प्रतिनिधी) : शहरातील बागवान गल्लीत तेराभाई मोहल्ल्यातील एका घरात घुसून कपाटातील रोख रकमेसह मोबाइल व बेन्टेक्सचे दागिने असा १३ हजार ७०० रुपये किमतीचा ऐवज चोरी करत असताना मध्य प्रदेशातील चोरट्यास पकडण्यात आले.
ही घटना बुधवारी रात्री ८:३० वाजता बागवान गल्लीत घडली. मोहम्मद नदीम मोहम्मद रफीक (२३, रा. ब-हाणपूर, मध्य प्रदेश) असे या चोरट्याचे नाव आहे. फैजान शेख रियाज शेख बागवान (रा. बागवान गल्ली, तेराभाई मोहल्ला, चाळीसगाव) या फळ विक्रेत्याच्या घरात तो घुसला आणि सुमारे १३ हजार ७०० रुपये किमतीचा ऐवज चोरी करताना आढळला. त्याला चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.