जळगाव (प्रतिनिधी ) ;- शहरात १० महागड्या साड्या चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता . या गुन्ह्यातील भोलासिंग बावरी वय २८ याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.
भोलासिंग बावरी आरोपी हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. तो त्याच्या घरी आल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाल्यावर लागलीच त्यास सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, किशोर पाटील ,मुकेश पाटील, चेतन सोनवणे, सुधीर साळवे ,सचिन पाटील, अशांनी ताब्यात घेतले होते व त्यास गुन्हे कामी अटक करण्यात आली होती. आज रोजी न्यायालयात हजर करण्यात आले होते. आरोपी या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून त्याचा एक भाऊ मोनू सिंग हा प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यांमध्ये कारागृहात असून त्याचा लहान भाऊ मोहन सिंग बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये कारागृहात आहे. संपूर्ण कुटुंबाची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी स्वरूपाची असून त्याच हद्दपार सुद्धा करण्यात आले होते . आरोपी भोलासिंग याला आज रोजी न्यायमूर्ती ए एस शेख यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले.