जळगाव ( प्रतिनिधी ) –एका घरातून अज्ञात चोरट्याने तीन मोबाईल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
महेश ज्ञानदेव भारंबे (वय-१८) हा तरूण शिक्षणासाठी जळगावातील शिव कॉलनी परिसरात राहतो. २० रोजी सकाळी ८ ते ९ वाजेच्या सुमारास घरी असतांना अज्ञात चोरट्यांनी त्या रूममधून ३२ हजार रूपये किंमतीचे तीन मोबाईल चोरून नेल्याचे निदर्शनास आले. महेश भारंबे यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.