जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील श्रीकृष्ण लॉन येथून एका महिलेची पर्स एका १२ वर्षीय मुलीने लंपास केल्याची घटना ९ रोजी घडली असून पर्समधून 5 हजार किमतीचा मोबाईल, रोकड असा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे.
मंगला मुरलीधर सपकाळे, वय- 56, रा. प्लॉट नं. 81 गट नं. 53, शिवकॉलनी, पती मुरलीधर सपकाळे, मुलगी पल्लवी यांच्यासोबत राहतात. मुलगी पल्लवी हिचे लग्न जमलेले असल्याने आम्ही तिचे लग्नासाठी व हळदीसाठी श्रीकृष्ण लॉन, शिरसोली रोड ९ ते १० दरम्यान ठरवलेला होता. रात्री ११ वाजेच्या सुमारास लॉन्समधील रूममध्ये जात असतांना 11 ते 12 वर्षे वयाची मुलगी हिने पर्स लंपास केल्याचे लक्षात आले. पर्समध्ये 1.00.00/- रू किची गुलाबी रंगाची पर्स , एक सॅमसंग गॅलक्सी एम 11 कंपनीचा पर्पल रंगाचा मोबाईल 3,08,000/- रू रोख रूपये असा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.