जळगाव ;- तालुक्यातील भोकर येथून अट्टल दुचाकी चोरट्याला एलसीबीच्या पथकाने आज अटक केली असून त्याला पुढील कारवाईसाठी पोलीस स्टेशनला ताब्यात देण्यात आले आहे.
पोलीस अधिक्षक डॉ.श्री प्रविण मुंढे ,अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांनी जिल्ह्यात होणाऱ्या दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकोस आणणे कामी स्थानोक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांना सुचना केल्या होत्या. त्या अनुशंघाने पोलीस निरीक्षक किरणकुपार बकाले यांनी पोहेकां प्रदिप पाटील, जयंत चौधरी, , पोहेकॉ सुनील दापोदरे, पोना विजय पाटील, अविनाश देवरे, दीपक शिंदे , पोकॉ-पंकज शिंदे व सुनील मोरे यांचे पथक तयार केले.
पोलोस निरीक्षक किरण कुमार बकाले यांना गोपनीय माहीती मिळाली कि , भोकर ता.जि. जळगांब येथील डीगंबर रवींद्र सोनवणे वय -२२ हा चोपडा भागात मोटर सायकल चोरीसारखे गुन्हे करीत आहेत.त्या वरील पथकाने गोरगावले बु. ता. चोपडा येथे ग्राहक पाठबुन सापळा रचुन डिगंबर रविंद्र सोनवणे याला चोरीची मोटार सायकल विकतांना ताब्यात घेतले . त्याने हि दुचाकी चोपडा येथुन चोरल्याची कबुली दिली. तसेच आणखी एक दुचाकी वैजापुर येथे पाठविल्याचे समजले . दोन्ही दुचाकी चोपडा शहरातून चोरी झाल्या असून जप्त करण्यात आल्या आहेत. चोपडा शहर पोस्टे येथे गुरनं १६६.२०२१,१६८:२०२१ प्रमाणे भादवी कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल असल्याचे समजले त्याबुरुन सदर मोटर सायकल चोरीमधील आरोपी डिगंबर रविंद्र सोनवणे वय -२२ रा. भोकर ता.जिल्हा जळगाव याला चोपडा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.