चोपडा तालुक्यातील चहार्डी येथील घटना
चोपडा (प्रतिनिधी) : तालुक्यातील चहार्डी गावातील गुजरपुरा भागात राहणाऱ्या बत्तीस वर्षे तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली. चोपडा शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
योगेश पांडुरंग पाटील (वय ३२) असे मयत तरुणाचे नाव आहे. परिवारासह तो चहार्डी गावात राहत होता. योगेश पाटील याने ३१ रोजी रात्री ८ वाजेपूर्वी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. कुटुंबियांना माहिती काढताच त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मयत घोषित केले.
आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नव्हते. याप्रकरणी चोपडा शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास चोपडा शहर पोलीस करत आहेत.