गलंगी गावात घडली घटना
चोपडा ( प्रतिनिधी ) – चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत गलंगी येथे चोरीच्या घटनांचे सत्र सुरूच असून, एकाच वेळी दोन दुचाकी एकच ठिकाणाहून चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही चोरी २४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ ते रात्री ८ वाजेच्या दरम्यान गलंगी येथील शांताराम देवराज यांच्या घरासमोरून झाली. फिर्यादी सुखदेव बापू भिल्ल (वय ३५, रा. शेंदणी, ता. चोपडा) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. चोरट्यांनी फिर्यादी आणि साक्षीदाराच्या मालकीच्या दोन गाड्या चोरून नेल्या. यात बजाज प्लॅटिना (सिल्व्हर रंगाची), क्रमांक एमएच -१९ सीबी-६७९२, किंमत ३० हजार रुपये), बजाज पल्सर २२० (काळ्या रंगाची), क्रमांक एमएच १९ डीजी-६२६४, किंमत ३० हजार रुपये) अशा एकूण ६०,००० रुपये किमतीच्या वाहने चोरट्यांनी फिर्यादीच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने चोरून नेल्या. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक महेश टाक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेकाँ हेमंत मोहन कोळी करत आहेत. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.









