एक ठार तर एक जखमी ; पोलीस घटनास्थळी दाखल
चोपडा (प्रतिनिधी) – चोपडा तालुक्यातील वर्डी गावापासून ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या जंगलात अडावद पोलीस स्टेशनच्या हद्दीत ट्रेनिंग विमान कोसळले यात एक पुरुष जागीच ठार तर एक महिला जखमी झाली आहे.
याबाबत चोपडा तालुक्यातील वर्डी परिसरातील सातपुड्याच्या पायथ्याशी विष्णापूर पासून नवरा नवरी धरणाच्या वरच्या बाजूला जंगल परिसरात आयता बारेलाच्या घराजवळ जंगलात शिरपुर येथील ट्रेनिंग विमान कोसळून.अपघात झाला आहे. या आपघातात शिकावू पुरुष पायलट नसरूल आमीन (वय – ३०) चा मृत्यू झाला आहे, तर एक शिकवू पायलट महिला आंशिका गुजर (वय-२१) गंभीर जखमी झाली आहे. सदर या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यावेळी जंगलात मोठा आवाज आल्यामुळे गावकऱ्यांनी जंगलाकडे धाव घेतली. परिसरातील नागरिकांनी जखमींना विमानांमधून बाहेर काढले असता यात पुरुष पायलट ठार झाले असल्याचे समजले. तर महिला पायलट जखमी अवस्थेत आढळली असून तिला वैद्यकीय उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. .घटनास्थळी अडावद व चोपडा पोलीस घटनास्थळी चोपडा तहसीलदार रावसाहेब गावित घटनास्थळी दाखल , पोलीस निरीक्षक दांडगे पोहचले असुन पुढील तपास करीत आहेत. सदर विमान हे शिरपूर येथील ट्रेनींग सेंटर मधील असल्याचे समजते.