चोपडा ( प्रतिनिधी ) – कस्तूरबा शाळेसमोर पार्किंगला लावलेली १५ हजार रूपये किंमतीची मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीला आली. चोपडा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
अर्जून भालेराव ( रा. पंचशिल नगर रामपूरा चोपडा ) हे कामानिमित्ताने २ सप्टेंबररोजी कस्तूरबा शाळेजवळ मोटारसायकल (एमएच १९ डीएच ५४४०) ने सायंकाळी आले. काम आटोपून रात्री ८ वाजता मोटारसायकलजवळ घरी जाण्यासाठी आले असता त्यांना त्यांची मोटारसायकल दिसून आली नाही. परिसरात शोधाशोध केली परंतू मिळाली नाही. अर्जून भालेराव यांनी चोपडा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून चोपडा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र सोनवणे करीत आहे.