चोपडा शहरातील घटना
चोपडा (प्रतिनिधी ) ;- तालुक्यातील माचला येथील २१ वर्षीय कुलदीप अशोक पगारे हा दुचाकीने घरी जात असताना शहरातील पदम मोहन मंगल कार्यालयाजवळ दुचाकी व ट्रकच्या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ७ रोजी सायंकाळच्या सुमारास घडली.
माचला येथील कुलदीप पगारे व रवींद्र आधार सैंदाणे (वय २१) हे दोघेही सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास माचला येथील आपल्या घरी दुचाकीने जात होते. यावल रोडवरील पदम मोहन मंगल कार्यालयाजवळून जात असताना दुचाकी व ट्रकमध्ये अपघात झाला. यात कुलदीप पगारे गंभीर जखमी झाला. त्याला लागलीच चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यातआले. परंतु, डॉ. स्वप्ना पाटील यांनी त्यास मयत घोषित केले. तर त्याच्या सोबत असलेल्या रवींद्र आधार सैंदाणे यास किरकोळ इजा झाली आहे. या प्रकरणी चोपडा शहर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत कुलदीपच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.