चोपडा ;- राष्ट्रवादी काँग्रेसच्या २२ व्या वर्धापनदिनानिमित्त १० जूनला जळगाव जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे जिल्हाभरातील युवक जास्तीत जास्त युवा वर्ग पक्षाशी जोडण्यासाठी व या युवाशक्तीचा वापर सुदृढ समाजउभारणी करण्याकरिता व्हावा या अनुषंगाने जिल्हाभर संपर्क अभियान राबविण्यात येत आहे.
२२ वर्षाच्या काळात पक्षाची स्थापना झाल्यानंतर पुढचे १५ वर्षे सलग सत्तेत असताना राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्रातील गोरगरीब व कष्टकरी जनतेसाठी घेतलेले समाजोपयोगी निर्णय तसेच शरद पवार केंद्रीय मंत्री असताना त्यांचे कृषी, शिक्षण, विज्ञान, आरोग्य, कला,क्रीडा व सामाजिक क्षेत्रातील त्यांचं बहुमूल्य योगदान तळागाळातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचावं हा एकमेव उद्देश घेऊन हे अभियान राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे जिल्हाध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य रविंद्र नाना पाटील यांच्यामार्फत राबवण्यात येत आहे.
याप्रसंगी, जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, चोपडा पीपल्स बँकेचे चेअरमन .चंद्रहास गुजराथी, जि.प.सदस्या नीलम पाटील, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा विजयापाटील यांनीही मनोगते व्यक्त केली.
यावेळी जिल्हा युवक कार्याध्यक्ष दीपक पाटील, तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, युवक तालुकाध्यक्ष मा.मनोज पाटील, युवक शहराध्यक्ष मा.समाधान माळी, मा.जि.प.अध्यक्ष मा.गोरख पाटील, चोपडा पीपल्स बँकेचे व्हा.चेअरमन .प्रवीण गुजराथी, चो.सा.का चेअरमन अतुल ठाकरे, कृ.उ.बा.चे सभापती कांतीलाल पाटील, शेतकी संघाचे अध्यक्ष दुर्गादास पाटील, पं.स.उपसभापती सूर्यकांत खैरनार, पं.स.माजी सभापती कल्पनाताई पाटील, पं.स.सदस्य तसेच महिला राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्षा भारतीताई बोरसे, मार्केट कमिटीचे माजी सभापती गिरीश पाटील, पं.स.माजी सभापती मा.भरत पाटील, पं.स.माजी सभापती विनायक पाटील, रा.काँ. सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष मा.निलेश बोदडे, रा.यु.काँ. जिल्हा उपाध्यक्ष मा.सनी सचदेव, रा.यु.काँ जिल्हा सरचिटणीस प्रफुल्ल स्वामी, युवक शहर कार्याध्यक्ष मा.प्रफुल्ल पाटील, सरपंच मा.दत्ता साबळे तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते बांधव उपस्थित होते.