वडती ता. चोपडा ;- शहरातील न. पा. हद्दीत सुरु असलेले बांधकाम अचानक येऊन न. पा. च्या कर्मचारी व अधिकारी यांनी पाडल्याने आणी नगरसेवकाच्या सांगण्यांवरून पाडल्याने वाद झाला आहे . यावेळी अतिक्रमण धारकास धमकावले म्हणून जाचास कंटाळून एकाने विष प्राशन केल्याची घटना 5 रोजी घडली. या प्रकरणी पीडिताच्या पत्नीने चोपडा पोलिसात संबंधितां विरुद्ध गुन्हा दाखल व्हावा म्हणून अर्ज देखील दिला आहे.
या बाबत पोलिसात दिलेल्या तक्रार अर्जात म्हटलं आहे की, मौजे चोपडा येथील गा. न.11 मधील प्लॉट न.7 हा दत्तू धाकू मराठे यांच्या मालकीचा असून या प्लॉटच्या दक्षिण बाजूस तीन फुटाच्या न. पा. हद्दीत बांधकाम सुरु असलेली भिंत मुख्याधिकारी यांनी नगरसेवक यांच्या खोट्या माहितीच्या आधारावर जेसीबी आणून तोडून टाकली. दरम्यान मुख्यधिकारी, नगरपालिका कर्मचारी राजेंद्र बाविस्कर, व हितेंद्र देशमुख यांच्या चिथावणीवरून न. पा. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काही एकूण घेतले नाही. दरम्यान माझ्या पतीला धमकावले याचा मनस्ताप झाला म्हणून माझ्या पतीने विष प्राशन केले आहे. तरी या घटनेची चौकशी करून दोषींविरुद्ध गुन्हा दाखल करावा असा अर्ज सौ. सुनीता दत्तू मराठे यांनी दिला आहे.







