चाळीसगाव (प्रतिनिधी) – सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र आयोजित धुळे विभागाने 1 मार्च रोजी किल्ले गाळणा तालुका मालेगाव येथे दुर्गदर्शन मोहीम आयोजित केली होती या मोहिमेत 23 दुर्गप्रेमी महिला व 20 बाल मावळ्यांनी सहभाग नोंदवला बाराव्या शतकात बांधलेल्या या किल्ल्यावर बहामनी, मराठे, निजाम व इंग्रजांनी शासन केले छत्रपती शिवरायांच्या आपल्या महाराष्ट्राच्या अस्मिता असलेल्या गड किल्ल्यांसाठी सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्रभर दुर्ग संवर्धनाचे काम करीत आहे या संस्थेमार्फत अनेक गडकोट किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम, दिशादर्शक फलक लावणे, सूचनाफलक लावणे,अडगळीत पडलेल्या तोफांना सागवानी तोफगाडे बसवून नवसंजीवनी देऊन त्यांचे लोकार्पण करणे, तसेच अनेक किल्ल्यांवर सागवानी महा दरवाजे बसवणे, जंजिरा किल्ल्यावर कायमस्वरूपी राष्ट्रध्वज फडकविण्यात आला, भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात उंच भगवा ध्वज पद्मदुर्ग किल्ल्यावर उभारण्यात आला अशा प्रकारचे कार्य सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात सुरु आहेत सह्याद्री प्रतिष्ठान उत्तर महाराष्ट्र महिला संपर्क प्रमुख सौ. स्मिताताई प्रशांत बच्छाव यांच्या नियोजनात किल्ले गाळणा येथील मोहिमेत गाळणा किल्ल्याविषयी माहिती महिलांना व मुलांना देण्यात आली व व किल्ल्यावर मिळालेल्या प्लास्टिक गोळा करून किल्ल्याच्या खाली आणण्यात आले 2017-18 या वर्षामध्ये पुरातत्व खात्या मार्फत या किल्ल्यावरील तटबंदी बुरुज व इतर कामे केली गेल्यामुळे किल्ला आज सुस्थितीत दिसत आहे पुढील काळात या किल्ल्यावर सह्याद्री प्रतिष्ठान मार्फत सूचना फलक लावणे व किल्ल्यास महादरवाजा बसविणे ही कामे केली जातील यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे श्री. शरद पाटील श्री. संजय हिरे श्री विलास मराठे श्री विजय सूर्यवंशी श्री शैलेश मासुळे शेखदादा सौ. छाया पाटील सौ. प्रीती कोळी सौ. स्वाती पवार सौ. अरुणा बोरसे सौ. संगीता कोळी सौ. मंगला खैरनार सौ. रोहिणी अहिरे सौ. संध्या गरुड सौ. रंजीता ठाकूर सौ कविता ईशी सौ मिराबाई इंगळे सौ शोभा डाबेराव सौ. योगिता सिद्धपुरे सौ. सीमा पाटील शहनाज कुरेशी कु. मानसी हिरे लळींग दुर्ग संवर्धन समितीचे श्री दिनेश वाघ व गोकुळ देवरे यांनी सहभाग नोंदविला किल्ल्याच्या पायथ्याशी श्री रामचंद्र मिसाळ यांच्या शेतात वनभोजनाचा आनंद घेण्यात आला या मोहिमेसाठी सह्याद्री प्रतिष्ठानचे महाराष्ट्र दुर्ग संवर्धन अध्यक्ष श्री गणेश रघुवीर व महाराष्ट्र संपर्कप्रमुख श्री प्रकाश नायर यांचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी तहसीलदार अमोल मोरे यांनी सदर रात्रीची वाहतूक बंद व्हावी यासाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवला असून उद्याच तात्काळ पोलीस प्रशासनाला सोबत घेऊन त्याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले. शहराच्या महत्वाच्या प्रश्नासाठी राजकारणाच्या पलिकडे जाऊन सर्वपक्षीय चाळीसगाववासीय एकत्र आल्याचे एक सकारात्मक चित्र यानिमित्ताने पाहायला मिळाले.
बायपास ची सुविधा असतानादेखील नियमांचे उल्लंघन करून चाळीसगाव शहरातून मोठमोठे अवजड वाहन रात्रभर होणारी वाहतूक यामुळे अनेक लोकांचे एक्सीडेंट मध्ये प्राण गेले आहेत आणि शहरातील रस्त्यांचीही नुकसान झाले आहे या अवजड वाहतुकीमुळे ठिकाणी खड्डे पडतात त्यामुळेही एक्सीडेंट होतात सुसाट वेगाने वाहने हे शहरातून जातात कोणत्याही जाणाऱ्या सामान्य नागरिकाचा विचार हे वाहनधारक करत नाहीत म्हणून यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अन्यथा सर्व चाळीसगावकर व सर्वपक्षीय सर्वात मोठे आंदोलन होईल यात काही नुकसान झाल्यास प्रशासन जबाबदार राहील याची दखल लवकरात लवकर प्रशासन व पोलीस विभाग यांनी घ्यायची आहे घटनास्थळी तहसीलदार व नायब तहसीलदार यांनी भेट दिली यांच्या आश्वासनाने आंदोलन मागे घेण्यात आले.