जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील चित्रा चौकातून ६० वर्षीय शेतकऱ्याची ६० हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेली आहे. शनिवारी रात्री शहर पोलीसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
प्रदीप शामराव देशमुख (वय-६१ ) रा. हरी ओम नगर, जुना कानळदारोड, शिवाजी नगर येथे कुटुंबियासह वास्तव्याला आहे. शेती करून कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. शेती कामासाठी त्यांच्याकडे एमएच १९ डीटी २११९ क्रमांकाची दुचाकी आहे. शुक्रवारी सायंकाळी प्रदीप देशमुख हे चित्रा चौकात दुचाकीने आले. दुचाकी विशाल ईलेक्ट्रिक दुकानासमोर पार्किंग केली होती. अवघ्या १० मिनीटात अज्ञात चोरट्याने त्यांची दुचाकी पार्किंगच्या ठिकाणाहून चोरून नेली. प्रदीप देशमुख यांनी दुचाकीचा शोध घेतला परंतू आढळून आली नाही. शनिवारी रात्री शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पो ना योगेश पाटील करीत आहेत .