जळगाव ( प्रतिनिधी ) – न्यायालयीन कोठडीत असताना बेदम मारहाणीत मृत्यू झालेल्या चिन्या उर्फ रवींद्र जगताप हत्याकांडात नशिराबाद पोलीस ठाण्यात तत्कालीन कारागृह अधीक्षकांसह ४ कर्मचाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा नशिराबाद येथून जळगाव जिल्हापेठ पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

यामुळे राज्यातील कारागृह प्रशासनात खळबळ उडाली आहे. गुन्हा नोंदवला जाण्यासाठी मयत चिन्या जगताप यांच्या परिवाराला १४ महिन्यांची वाट पहावी लागली आहे. आता संशयित आरोपी कारागृह अधिक्षक पेट्रस गायकवाड यांच्यासह तुरुंगधिकारी जितेंद्र माळी, कारागृह पोलीस कर्मचारी अण्णा काकड, अरविंद पाटील, दत्ता खोत या कर्मचाऱ्यांच्या अटकेकडे लक्ष लागून आहे. पुढील तपास जिल्हा पेठ पोलीस स्टेशनचे पो.नि.रामदास वाकोडे करीत आहे.







