नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – चीननं आता बुलेट ट्रेनमधून सैनिक अरुणाचल सीमेजवळ पाठवलं आहे. भारताविरोधात शक्तिप्रदर्शन असल्याचं बोललं जात आहे. तिबेटची राजधानी ल्हासामदून बुलेट ट्रेननं सैनिक अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळील निंगची शहरात पोहोचलं आहे.
चीन आणि भारतात ३४८८ किलोमीटर लाइन ऑफ अॅक्च्युअल कंट्रोलवरून वाद आहे. त्यामुळे चीनने पुन्हा एकदा भारताविरुद्ध कुरापती करण्यास सुरुवात केली आहे. चीन अरुणाचल प्रदेशावर आपला दावा सांगत आहे. मात्र भारताने हा दावा फेटाळून लावला आहे. यापूर्वी या भागात हवाई तळांची उभारणी आणि क्षेपणास्त्रही तैनात केली आहेत. आता पीपल्स लिबरेशन आर्मीने आपलं सैनिक ४५०० मीटर उंचीवरील ठिकाणावर पाठवलं आहे. याबाबतचं वृत्त ग्लोबल टाईम्सने दिलं आहे. २३ जुलैला चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी अरुणाचल प्रदेश जवळील तिबेटचा दौरा केला होता. २०११ साली सत्तेत आल्यानंतर जिनपिंग यांचा पहिला तिबेट दौरा होता. शी यांनी ब्रह्मपुत्र नदीवर बनलेल्या पुलाची पाहणी केली. चीन ब्रह्मपुत्र नदीवर जगातील सर्वात मोठं धरण बांधत आहे. भारताने या प्रकल्पाला विरोध केला आहे.