जळगाव तालुक्यातील घटना, ओळख पटवण्याचे आवाहन
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील चिंचोली येथील शासकीय मेडिकल हब येथील एका विहिरीत अनोळखी पुरुषाचा मृतदेह शनिवारी दि. २५ रोजी सकाळी ११ वाजता आढळून आला आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली असून ओळख पटवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
लेबर सुपरवायजर विजयकुमार यादव यांनी पोलीस स्टेशनला माहिती दिली. शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास विहिरीतील पाण्यात हा ४० ते ४५ वर्षोय तरंगत असताना आढळून आला आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गणेश वाघ तपास करीत आहेत.