पाचोरा (प्रतिनिधी ) तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील ग्राम विकास मंडळातर्फे ग्रामविकास कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. राजेंद्र चिंचोले यांचा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल सपत्नीक सत्कार व गौरव समारंभ 12 फेब्रुवारी रोजी पाचोरा भडगावचे आ. किशोर पाटील यांच्या हस्ते झाला .
कार्यक्रमाचे अध्यक्ष पाचोरा भडगावचे माजी आ. दिलीप वाघ हे होते . प्रमुख अतिथी खासदारांच्या सुविद्य पत्नी सौ संपदा उन्मेश पाटील, भाजपा युवा नेते अमोलभाऊ शिंदे ,जि. प .सदस्य मधुकर काटे आणि पंचायत समिती सदस्य सौ रत्नप्रभा पाटील होते .
प्रमुख मार्गदर्शक दीपस्तंभ फाउंडेशनचे संचालक यजुर्वेंद्र महाजन सर, उपविभागीय अधिकारी डॉ.श्री विक्रमजी बांदल हे होते
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती मंडळाचे अध्यक्ष देविदास महाजन, चिटणीस रवींद्र जाधव ,ग्राम विकास विद्यालयाचे प्राचार्य प्रमोद महाजन , नितीन तावडे ,डॉ.भरत पाटील, शरद पाटे, एसटी गीते, पी एस पाटील , ग्राम विकास मंडळाचे संचालक मंडळ व पंचक्रोशीतील नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात प्राध्यापक राजेंद्र चिंचोले त्यांच्या पत्नी सविता चिंचोले व आई श्रीमती प्रमिला चिंचले यांचा सत्कार करण्यात आला.
आपल्या परिसरासाठी प्राध्यापक राजेंद्र चिंचोले ढे भूषण आहे. गेल्या 25 वर्षापासून अखंडपणे स्पर्धा परीक्षांचा मोफत मार्गदर्शन राज्यभर करीत आले आहेत असे गौरवोद्गार आमदार किशोर आप्पा पाटील यांनी काढले तसेच ग्राम विकास मंडळ करीत असलेल्या कार्याबद्दल मंडळाचे कौतुक केले .ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थ्यांना आपण सातत्याने मार्गदर्शन करत राहावे अशा प्रकारचे आवाहन आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केले.
याप्रसंगी अध्यक्षीय भाषण करताना माजी आमदार दिलीप वाघ यांनी चिंचोले सरांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये सर्वोच्च योगदान तर दिलेच पण त्यासोबत ग्रामीण भागात स्पर्धा परीक्षा चळवळ चालवली.
दीपस्तंभ फाउंडेशन चे संचालक यजुर्वेंद्र महाजन यांनी आपल्या मनोगतातून चिंचोले सरांनी स्पर्धापरीक्षां च्या चळवळीचा पाया रचला व दीपस्तंभ फाउंडेशन च्या माध्यमातून आम्ही त्यावर कळस चढवला .एक भौतिक शास्त्र शिक्षक आपल्या अध्यापनाव्यतिरिक्त राज्यभर स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करतो ही बाब अत्यंत भूषणावहवआहे असे प्रतिपादन त्यांनी केले.
भाजपा युवा नेते अमोल भाऊ शिंदे यांनी चिंचोले सर माझ्यासह असंख्य तरुणांचे प्रेरणास्थान आहे .आज माझ्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे अशा प्रकारचे प्रतिपादन त्यांनी केले .खासदार उन्मेश पाटील यांच्या पत्नी सौ संपदा ताई पाटील यांनी प्रा.राजेंद्र चिंचोले व यजुर्वेंद्र महाजन जळगाव जिल्ह्याचे भूषण आहे अशा प्रकारचे. प्रतिपादन केले पाचोर्याचे प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल यांनी स्पर्धा परीक्षांविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रा.राजेंद्र चिंचोले यांचे विविध वृत्तपत्रातील लेख व स्पर्धा परीक्षा सारथी पुस्तक हे विद्यार्थ्यांना त्यांचं करिअर इतर शिखर गाठण्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे त्यांनी यावेळी प्रतिपादन केले.
जिल्हा परिषद सदस्य मधुभाऊ काटे यांनी त्यांच्या मनोगतात प्रा.राजेंद्र चिंचोले हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी दिपस्तंभ आहे असे प्रतिपादन केले .
ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष देविदास महाजन यांनी प्रा.चिंचोले यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य प्रमोद महाजन यांनी केले . सन्मानपत्राचे वाचन संदीप पाटील यांनी केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज सोनवणे ,अभिजीत पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन संदीप पाटील यांनी केले .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्राम विकास मंडळाचे पदाधिकारी ,सत्कार समिती तसेच सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.