चुंचाळे ता.यावल (वार्ताहर)-
कोरोना ‘ संसर्गिक आजाराच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत येथील दुकान नं.३२ व ३३ या दोघ स्वस्त धान्य दुकानात आज दि.२७ रोजी लाभार्थ्यांना मोफत तांदूळ वाटप करण्यास सुरुवात झाली.लाभार्थी प्रती व्यक्तीस पाच किलो प्रमाणे तांदूळ वाटप करण्यात आले.यावेळी लोकनियुक्त सरपंच सुंनदा पाटील ,तंटा मुक्ती अध्यक्ष धनसिंग राजपूत,पोलीस पाटील गणेश पाटील,यांच्या प्रमुख उपस्थितीत वाटप करण्यात आले.यावेळी ग्रामसेवक सपकाळे, तलाटी पि.एन.नेहते,रेशनिग दुकानदार सुनिल नेवे,नितीन नेवे ,सामाजिक कार्यकर्ते संजय पाटील,कोतवाल विशाल राजपूत , माजी.ग्रा.पं.सदस्य विठ्ठल राजपूत,शिक्षक गिरीश सपकाळे, मंजित तडवी,राजु सोनवणे,ग्रामरोजगार सेवक दिपक कोळी,संगणक चालक सुधाकर कोळी,पत्रकार प्रकाश चौधरी,गोकुळ कोळी यांचेसह संबंधित कर्मचारी उपस्थित होते. या वाटप दरम्यान ‘सोशल डिस्टिंक्शन ‘ चे काटेकोरपणे पालन करण्यात आले. मोफत तांदूळ वाटप झाल्याने लाभार्थ्यांना मध्ये समाधान व्यक्त होत होते