जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मुस्लिम महिला व पुरुषांनी आज जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातुन राष्ट्रपती , पंतप्रधान व केंद्रीय गृहमंत्री यांना त्रिपुरातील व चीनमधील मुस्लिमांवर होत असलेल्या अन्यायाचा निषेध करणारे निवेदन पाठवले.


चीनमधील मशिदीचे घुमट व मिनार पाडण्याची कारवाई होत आहे चीनमधील हुई मुस्लिम तेराशे वर्षापासून वास्तव्यास आहेत त्यांचे रक्षण करण्यात यावे, मुस्लिम हुईवर होत असलेला अत्याचार थांबवावा चीनने दोन वर्षात मुस्लिम धार्मिक संस्था बंद करून इमामांना अटक केली आहे त्यांची सुटका करण्यात यावी असे या निवेदनात म्हटले आहे . हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत दिल्लीतील चीनच्या दूतावासाला पाठवण्यात आले आहे या निवेदनाची प्रत युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन व ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक ऑपरेशन यांना सुद्धा पाठवण्यात आले आहे.

सय्यद चांद व फिरोझा शेख यांनी या शिष्टमंडळाचे नेतृत्व केले यावेळी मनियार बिरादरीचे फारुक शेख, राष्ट्रवादीचे फिरोज शेख, शिकलगार बिरादरीचे अन्वर शिकलगर व अझीझ सिकलगर, फारूक अहेलेकार, वसीम खान, जामा मशीद ट्रस्टचे सय्यद चांद, मुस्ताक मिर्झा, शेख मोहिनुद्दीन इक्बाल व अझीझ खान, दानिश सय्यद , पत्रकार शेख कामिल व कैफ खान, अँड कु. नसरून फातेमा पिरजादे, सौ राणी शेख , श्रीमती रहेमत पटेल , मुस्तफाखान, महबूब शेख, मुजाहिद खान, तोफिक पटेल आदींची उपस्थिती होती.







