भुसावळ तालुक्यात साकेगाव येथील घटना
भुसावळ ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील साकेगाव येथील विट भट्टीजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने खेळत असलेल्या एका ३ वर्षाच्या बालकाला चिरडल्याने जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना गुरूवारी ८ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वाजता घडली. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

जयेश बलराम निशाद (वय ३ रा. छत्तीसगड ह.मु. साकेगाव ता. भुसावळ) असे मयत झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. जयेश निशाद हा परिवारासह वास्तव्याला होता. त्याचे आईवडील हे विटभट्टीवर काम करतात. दरम्यान, गुरूवारी ८ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास जयेश हा खेळत असतांना भरधाव वेगाने येणारा ट्रक क्रमांक (एमएच १९ झेड ४१६४) ने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात जयेश हा ट्रकच्या मागच्या चाकाखाली आल्याने चिरडला गेला आणि त्याचा दुदैवी अंत झाला. यावेळी त्याच्या आईवडीलांनी एकच आक्रोश केला होता. या घटनेबाबत भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात ट्रक चालक संजय पंडीत पाटील (रा. साकेगाव ता. भुसावळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास संजय भोई हे करीत आहे.









