जळगाव ( प्रतिनिधी ) – जागतिक महिला दिनानिमित्त स्व.लता मंगेशकर यांना श्रद्धान्जलिपर बुलढाना जिल्हास्तरीय गितगायन स्पर्धा चिखली येथे हिरकनी महिला अर्बन संस्थेतर्फे आयोजित करण्यात आली होती
विविध जिल्ह्यातून अनेक स्पर्धक आले होते त्यातून टॉप 22 स्पर्धक 2 फेऱ्यांमधून निवडले गेले त्यात लहान गटात 11 (वय 5 ते 16 ) 1 ल्या क्रमांकाचे बक्षीस पाचोरा येथील कु.धनश्री कुलकर्णी हिने पटकवले.तिला प्रमाणपत्र ट्रॉफी व गिफ्ट हैम्पर देण्यात आले
या कार्यक्रमासाठी पुणे येथील गायिका सौ वैशाली डोम्बे व वृषाली इनामदार या परीक्षक म्हणून आल्या होत्या, त्यानी धनश्रीचे कौतुक करून तिला आशीर्वाद दिले या कार्यक्रमाच्या प्रमुख चिखलीचे माजी आमदार राहुल बोन्द्रे यांच्या पत्नी वृषाली बोन्द्रे यांनी हा गायन कार्यक्रम फक्त महिलांसाठी आयोजित केला होता.