जळगाव ;– शहरातील शिवाजीनगर भागातील उस्मानिया पार्क येथे अंगणात खेळत असलेल्या दीड वर्षाच्या बालकावर पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना आज गुरूवारी सकाळी १० वाजता येथे घडली. नागरिकांनी वेळीच धाव घेऊन बालकाला कुत्र्याच्या तावडीतून वाचवून त्वरित उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
उस्मानिया पार्क येथे शाहरूख खान यांचा दीड वर्षाचा मुलगा इरफान शाहरूख खान राहत्या घराच्या अंगणात आज गुरूवारी सकाळी १० वाजता एकटाच खेळत होता. अचानकपणे एका पिसाळलेल्या कुत्र्याने बालकावर हल्ला केला. कुत्र्याने बालकाच्या मानेवर जोरदार चावा घेतल्याने बालक गंभीर जखमी झाले. बालकावर कुत्र्याने हल्ला केल्याचे पाहून आई नाजमीबी यांनी आरडाओरड केली. त्यावेळी परिसरातील नागरीकांनी धाव घेवून बालकाला कुत्र्याच्या तावडीतून सोडविले. तातडीने खासगी वाहनाने जखमी बालकाला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारर्थ दाखल करण्यात आले आहे.








