नाट्यगृहात राजांची जयंती उत्साहात साजरी
जळगाव (प्रतिनिधी) :- छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने बुधवारी महाबळ येथील छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहात संभाजी राजांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. स्मिताताई वाघ होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून समितीचे अध्यक्ष आ. राजूमामा भोळे यांची उपस्थिती होती.
या प्रसंगी छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समितीचे समन्वयक शंभु पाटील यांनी जळगाव शहरात अद्यापही छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक अथवा पुतळा नसल्याबद्दल तीव्र खंत व्यक्त केली. शहराचे आमदार राजुमामा भोळे यांनी, जळगाव शहरात वर्षभराच्या आत छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामाला सुरवात करणार अशी घोषणा केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. स्मिताताई वाघ यांनीही, संभाजी राजेंचे स्मारक जळगाव शहरात निर्माण व्हावे. याकामी स्वतः लक्ष घालणार आहे, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमात छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमात अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. त्यात समितीचे उपाध्यक्ष अरविंद देशमुख, कैलास सोनवणे, डीवायएसपी संदीप गावित, सचिव प्रमोद पाटील, विष्णू भंगाळे, दीपक सूर्यवंशी, इंजी. विनोद पाटील, पुरुषोत्तम चौधरी, विनोद देशमुख, जमील देशपांडे, मुकुंद सपकाळे, प्रफुल्ल पाटील, दिलीप सपकाळे, राजेंद्र देशमुख, सुरेंद्र पाटील, अजयकुमार पाटील, योगेश पाटील, राहुल पाटील, आकाश हिवाळे, शुभम अहिरे, अनिल नन्नवरे व इतर मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध, उत्साही आणि प्रेरणादायी स्वरूपात पार पडला. यशस्वीतेसाठी सचिव प्रमोद बळीराम पाटील, योगेश पाटील, शुभम अहिरे, अनिल नन्नवरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रमपूर्वक संयोजन केले. कार्यक्रमानंतर सर्व मान्यवर व शिवप्रेमींनी एकत्र येऊन महाराजांच्या कार्याचा गौरव करत भविष्यातील स्मारकाच्या उभारणीसाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला.