चोपडा (प्रतिनिधी) – चांदसणी उपकेंद्र या ठिकाणी कोव्हीड १९ लसीकरण ४५ वर्षे वयोगटातील वरील लसीकरण आज ९ रोजी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप लासूरकर व वैद्यकीय अधिकारी डॉ. विष्णुप्रसाद दायमा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कोविड लसीकरणात आरोग्य सहाय्यक डॉ. प्रकाश पारधी, डॉक्टर महेंद्र पाटील, डॉ. दिनकर वाघ, डॉ अविनाश चव्हाण, आरोग्य सेविका उज्वला परदेसी, आशा स्वयं सेविका संगीता धनगर ,शोभा न्हावी, तसेच ग्रामपंचायत चांदसणी ग्रामसेवक के बी कोळी , सरपंच मिराबाई भालेराव पोलीस पाटील भिकन भालेराव ,व पदाधिकारी व पाणीपुरवठा कर्मचारी, प्रविण गायकवाड, तसेच ग्रामपंचायत कमळगाव सरपंच रोहित साळुंके ,उपसरपंच ज्ञानेश्वर धनगर व सर्व पदाधिकारी , तसेच अ.हो.मा.वि.चे शिक्षक विशाल सोनवणे, संगणक परिचालक वैभव धनगर यांचे सर्वांचे अनमोल सहकार्य लाभले.
कमळगाव चांदसणी रूखणखेडा परिसरातील कोविड 19चे कोविशिल्ड लसीकरणाचा 108 लाभार्थींनी लाभ घेतला. व तसेच उत्कृष्ट कार्यक्रम घेण्याचे पुन्हा घेण्याचे कमळगाव उपसरपंच ज्ञानेश्वर धनगर व ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी मागणी केली आहे.
तसेच पोलीस प्रशासन एपीआय किरण दांडगे व त्यांचे कर्मचारी कार्यक्रम यशस्वीरित्या मदत केली. सोशल डिस्टंसिंग चे पालन करण्यात आले. त्यात उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला.
एक महत्त्वाची बाब म्हणजे लसीकरण झाल्यानंतर कमळगाव चांदसणी गावातआरटीपीसीआर स्वाब तपासणी साठी प्रयोगशाळा अधिकारी डॉ राजेश महाजन यांनी 22 स्वाब घेतले.