जळगाव ( प्रतिनिधी ) – बोदवड शहरासाठी ४४ कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली असल्याची माहिती आज आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली .
बोदवड नगरपंचायत निवडणुकीत आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आज पहिल्यांदा ते माध्यमांशी बोलत होते . आमदार चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की , या यशाबद्दल आधी सर्वांचे आभार . आम्हाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे या शहरासाठीच्या मूलभूत सुविधांची कामे आधी पूर्ण करू . जनता शिवसेनेच्या बाजूने आहे हे आता स्पष्ट झाले आहे . माझ्यासाठी विधानसभा कठीण होती हे इतरांना वाटत असेल पण परिवर्तन लोकांना हवे होते तेच बोदवडमध्येही झाले आहे . आम्ही काहीच गुपचूप करीत नाही आम्ही सगळ्यांनाच तोंड दिले निवडणुकीत समोरच्याला तुल्यबळ मानून काम करावे लागते . एकनाथराव खडसे यांनी त्यांच्या परीने आणि मी माझ्या परीने प्रयत्न केला युती किंवा आघाडीच्या निर्णय होण्यामागे सगळ्याच परिस्थितीचा विचार करावा लागतो बोदवड शहरासाठी ४४ कोटी खर्चाची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली असली तरी या तालुक्यात पाण्याचे नैसर्गिक स्रोत मजबूत नाहीत हे वास्तव आहे या शहराला लांबून पाणी आणावे लागणार आहे , असेही ते म्हणाले.