अंतिम सामन्यात कुलदीप,चक्रवर्तीने घेतले २ बळी
नवी दिल्ली (वृत्तसेवा) : चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूजीलँडला २५१ धावांत रोखण्यात यश मिळविले आहे. फिरकी गोलंदाज वरून चक्रवर्ती आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.
न्यूझीलँड संघाने प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांची सलामी जोडी रचिन रवींद्र आणि विल यंग यांनी सुरुवात चांगली केली. मात्र वरून चक्रवर्तीच्या पहिल्याच षटकांत विल यंग याला पायचीत बाद करण्यात यश मिळाले. डेरेल मिचेल याने १०१ चेंडूत ६३ आणि मायकेल ब्रेसवेल ४० चेंडूत नाबाद ५३ धावांची खेळी केली. मोहम्मद शमी, रविंद्र जडेजा यांनी एक गडी बाद केला. न्यूझीलँड संघाने ७ गड्यांच्या मोबदल्यात २५१ धावा केल्या. आता भारताला २५२ धावा हव्या आहेत.
भारत-न्यूझीलंड यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या यंदाच्या हंगामातील जेतेपदासाठीचा फायनल सामना दुबईच्या मैदानात रंगला आहे. या सामन्यातही भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मानं टॉस गमावला. वनडेत भारतीय संघानं सलग १५ व्या वेळी टॉस टॉस गमावला असून रोहित शर्मा हा सलग १२ वेळा टॉस गमावणारा कॅप्टन ठरलाय. वनडेत सलग सर्वाधिक वेळा टॉस गमावणाऱ्या कॅरेबियन दिग्गज ब्रायन लाराच्या नकोशा विक्रमाची त्याने बरोबरी केलीये. पुन्हा एकदा टॉस गमावल्यावर रोहित शर्मालाही हसू अनावर झाल्याचा सीनही मैदानात पाहायला मिळाला. मग त्याने टॉस जिंकला नसला तरी मॅच जिंकू, असा विश्वासही व्यक्त केला.