• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

डाळीच्या ट्रकची लावली भिवंडीत परस्पर विल्हेवाट, चालकाला पोलीस कोठडी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 4, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
डाळीच्या ट्रकची लावली भिवंडीत परस्पर विल्हेवाट, चालकाला पोलीस कोठडी

जळगावातील व्यापाऱ्याची झाली फसवणूक

जळगाव (प्रतिनिधी) : डाळीने भरलेला ट्रक हा इच्छित स्थळी न पोहोचविता त्याचा रस्त्यातच कुठेतरी विल्हेवाट लावून अफरातफर केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी ट्रकच्या चालकाला मध्यप्रदेशातून अटक केली आहे. त्याला ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याने भिवंडीत ट्रकची विल्हेवाट लावल्याचे सांगितले आहे. त्याच्यावर यापूर्वी खुनाचा गुन्हादेखील दाखल आहे.

तिलक रविंद्र काबरा (वय ३१ वर्षे, रा. चैत्रबन कॉलनी, महाबळ परिसर, जळगाव) यांची जळगाव एम.आय.डी.सी. परिसरात असलेल्या सेक्टर नं. एस ३८/३९ मध्ये राधाकृष्ण अॅग्रो इंड्रस्ट्रिज प्रायव्हेट लिमीटेड या दालमिल कंपनी आहे. पनवेल जि रायगड येथे २७ लाख २९ हजार ६७८ रुपये किमतीच्या त्यांच्या कंपनीच्या दाळी या अनिल प्रल्हाद खेडकर (रा. पनवेल ता जि रायगड) यांच्या मालकीच्या ट्रेलर क्रमांक डी.डी ०१ एम ९४६५ मध्ये चालक राजासिंग उर्फ राजा अग्निदेवसिंग चौहान (रा. मरसराहा, सीधी, मध्यप्रदेश) हा घेवुन गेला होता. त्यांने सदरचा माल हा पनवेल येथे पोहचविला नव्हता. सदर मालाची त्याने परस्पर कुठतरी अफरातफर करुन विल्हेवाट लावली होती. म्हणून सदर बाबतीत तिलक काबरा यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदरचा गुन्हा घडल्यानंतर चालक राजासिंग चौहान हा पसार झाला होता. त्याचा शोध सुरु होता. या दरम्यांन तो सिधी, मध्यप्रदेश येथे असल्यांबाबतची माहिती पोलीस निरिक्षक बबन आव्हाड यांना मिळाली होती. त्याप्रमाणे एमआयडीसी पोस्टेचे पोउनि/दत्तात्रय पोटे, सफौ / अतुल वंजारी, पोहेकाँ/किरण पाटील, विशाल कोळी, राहुल रगडे, साईनाथ मुंढे अशांनी जाउन सलग ३ दिवस माहिती काढली. संशयित आरोपी राजासिंग उर्फ राजा अग्निदेवसिंग चौहान यास त्याचे गावी मरसराह, सिधी मध्यप्रदेश येथुन जंगलातुन स्थानिक पोलीसांच्या मदतीने ताब्यात घेतले होते.

त्याला गुन्हयाकामी अटक करण्यात आली आहे. त्यास न्यायमुर्ती वसीम देशमुख यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ०६ दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे. सरकार तर्फे अॅड. स्वाती निकम यांनी कामकाज पाहिले. सदर मालाची त्याने भिवंडी शहरात विल्हेवाट लावल्याची कबुली दिली आहे. सदर राजासिंग चौहान याच्यावर याआधी एक खुनाचा गुन्हा दाखल आहे. त्याच्या ईतर साथीदारांचा शोध सुरु आहे. सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक महेश्वर रेडडी, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक बबन आव्हाड, पोउनि/दत्तात्रय पोटे, सफौ अतुल वंजारी, पोहेकों/किरण पाटील, विशाल कोळी, राहुल रगडे, साईनाथ मुंढे अशांनी केली आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

बेरोजगार तरुणाची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या

Next Post

वादळी वाऱ्याने घरावर झाड कोसळून दबल्याने चार जण जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
वादळी वाऱ्याने घरावर झाड कोसळून दबल्याने चार जण जखमी

वादळी वाऱ्याने घरावर झाड कोसळून दबल्याने चार जण जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

 ३८ वर्षीय महिलेच्या पोटातील आतड्यांचा पीळ शस्त्रक्रियेद्वारे यशस्वीरीत्या सुटला
1xbet russia

 ३८ वर्षीय महिलेच्या पोटातील आतड्यांचा पीळ शस्त्रक्रियेद्वारे यशस्वीरीत्या सुटला

February 18, 2026
डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महा.सह गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिवजंयती जल्लोष
1xbet russia

डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महा.सह गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिवजंयती जल्लोष

February 18, 2026
जळगाव शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात पगारकोंडी
1xbet russia

जळगाव शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात पगारकोंडी

February 17, 2026
उपमुख्यमंत्र्यांचा पीए भासवून १८ जणांची केली ५५ लाख रुपयात फसवणूक, जळगावात गुन्हा दाखल
1xbet russia

‘दक्षता’ पेट्रोल पंपावर १.३३ कोटींचा अपहार, व्यवस्थापकावर गुन्हा दाखल

February 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

 ३८ वर्षीय महिलेच्या पोटातील आतड्यांचा पीळ शस्त्रक्रियेद्वारे यशस्वीरीत्या सुटला

 ३८ वर्षीय महिलेच्या पोटातील आतड्यांचा पीळ शस्त्रक्रियेद्वारे यशस्वीरीत्या सुटला

February 18, 2026
डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महा.सह गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिवजंयती जल्लोष

डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महा.सह गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिवजंयती जल्लोष

February 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon