जळगाव ( प्रतिनिधी ) – राज्य परिवहन मंडळ चाळीसगाव आगार एसटी कर्मचारी संपास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज दुपारी आंदोलनस्थळी आंदोलनकर्त्यांना भेट देऊन पाठींबा जाहीर केला . राज्य शासनात विलनिकरण करून कर्मचाऱ्यांचे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सवलती, वेतन, भत्ते, लागू करण्यात यावे, या मागणीसाठी चाळीसगाव तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पाठींबा देण्यात आला.
मनसे जिल्हाध्यक्ष अनिल वाघ, जिल्हा सचिव विलास बडगुजर, तालुकाध्यक्ष संग्राम शिंदे, शहर प्रमुख आण्णा विसपुते, उपशहर प्रमुख पंकज स्वार, विभाग प्रमुख वाल्मिक पाटील, सरचिटणीस प्रवीण वजरे, माजी सैनिक आबासाहेब गुरड, प्रसिध्दीप्रमुख दिपक पवार, भाईदास बोरसे, मनविसे शहरप्रमुख दर्शन चौधरी, यशवंत चव्हाण, भाऊसाहेब चौधरी, हर्षल जाधव , तुषार देशमुख, कल्पेश सुतार, शाम पाटील, जितेंद्र देसले, आबा भुवर, बबलु महाजन, तुषार पाटील हे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.







