चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – इच्छापूर तांडा येथे दाम्पत्य दुचाकीवरून जाताना धक्का लागल्याच्या कारणावरून एकाला जबर मारहाण करण्यात आली चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्थानकात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
करगाव इच्छापूर तांडा क्र. १ येथील विजय छगन राठोड (वय-४५) हा पत्नीसह दुचाकीवरून गावातील हनुमान मंदिर जवळून जात असताना ज्ञानेश्वर लक्ष्मण पवार यांच्या पायाला धक्का लागला. त्यावर ज्ञानेश्वर लक्ष्मण पवार व दिपक लक्ष्मण पवार (दोघेही रा. करगाव इच्छापूर तांडा क्र. १) यांनी विजय छगन राठोड याला चापटबुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. दिपक पवार यांनी रोडवरील दगड उचलून विजय राठोड याच्याकडे फेकून मारल्याने विजय हे जखमी झाले. हि घटना बुधवारी सायंकाळी घडली. विजय राठोड यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात भादवी कलम- ३२४, ३२३, ३३७, ५०४ कलमान्वये दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो नि संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास दत्तात्रय महाजन हे करीत आहेत.