चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी जिल्हा सरचिटणीस हर्षवर्धन खैरनार यांनी चाळीसगाव पुरग्रस्तांना सांगली , रत्नागिरीप्रमाणे मदत द्या अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे केली आहे

येथे गेल्या मंगळवारी पावसाने झालेल्या हानीमुळे व पुरामुळे चाळीसगाव तालुक्यात बऱ्याच मोठ्या प्रमाणात घरांची , शेतीची आणि पशुधनाची हानी झाली शेतकऱ्यांचे बरेच नुकसान झाले.
यासंदर्भात जळगाव राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी जिल्हा सरचिटणीस हर्षवर्धन खैरनार यांनी मुंबईत खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली व चाळीसगाव पुरग्रस्तांसाठी सांगली तसेच रत्नागिरीला ज्या प्रमाणे मदत दिली त्याच प्रमाणे राज्य सरकारकडून मदत मिळावी यासाठी निवेदन देऊन चर्चा केली आपण या संदर्भात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी चर्चा करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे हर्षवर्धन खैरनार यांनी केली. खासदार सुप्रिया सुळे यांनी लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून मदत लवकर मिळवून देऊ असा विश्वास दिला.







