चाळीसगाव — प्रभाग क्रमांक 1 मधील शिवदर्शन कॉलनी पोस्ट कॉलनी व शिवपार्वती नगर मधील नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून पथदिवे नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे.रात्री अंधार असल्याने येथून महिला मुलींना फिरणे धोक्याचे असून अनेकदा चोरीच्या घटना, मंगळसूत्र चोरण्याच्या घटना झाल्या आहेत. त्यामुळे येथील नागरिकानी सायंकाळी फिरता येत नाही. यासाठी तातडीने प्रभाग क्रमांक एक मध्ये शिवदर्शन,पोस्टल कॉलनी , शिवपार्वती नगर येथे नवीन पोल बसवले जावेत अन्यथा आंदोलन केले जाईल असा इशारा पीएम मोदी ऑर्गनायझेशनचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांच्यासह ऋषी पाटील, आशिष खूपसे, हर्षल पाटील, पियुष पाटील, अविनाश पाटील, बोलू सोनवणे, भुषण पाटील, नयन ब्रम्हेचा तसेच प्रभागातील नागरिकांनी दिला आहे यासंबंधीचे निवेदन नगर परिषदेच्या प्रभारी मुख्याधिकारी स्नेहा फडतरे यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे.







