चाळीसगांव – शहरातील धुळे रोड स्थित मोरयानगर येथे मोरयानगर मित्रपरिवाराने पहिल्यांदा रक्तदान करून सामाजिक हित जोपासून एक नवीन आदर्श तरुणाईने समाजासमोर निर्माण केलाय,
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. मानवी जीवन वाचविणारे आणि मानवी नाते दृढ करणारे हे सामाजिक कार्य आहे. हे कार्य निरपेक्षपणे करणाऱ्या सामाजिक कृतज्ञता म्हणून कोवीड काळात रक्ताचा तुटवडा भासत असल्याने रक्तदान करण्यात आले . गरजूंचे प्राण वाचविणाऱ्या रक्तदानाविषयी जनजागृती व्हावी आणि अनेकांनी या सामाजिक कार्यात सहभागी व्हावे, या सदिच्छा व्यक्त करीत मानवतेचे नाते जपूया ही भावना ठेवून शुभम गोत्रे यांनी आभार व्यक्त केले.
जीवन सुरभी ब्लड बँक येथे शुभम गोत्रे, स्वप्नील गोत्रे, दिगंबर गायकवाड, भावेश गायकवाड, जितेंद्र निकम, सचिन साळुंखे,राहुल पाटील, दीपक वाघ , अक्षय पडळकर, लोकेश सैंदाने, गौरव सोनजे यांनी रक्तदान केले.