चाळीसगाव( प्रतिनिधी ) ;- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राष्ट्रीय विद्यालयाच्या २००२ च्या बॅचच्या विद्यार्थ्यानी एकत्र येऊन शहरातील के. आर. कोतकर कॉलेज येथील मुलांच्या वसतिगृहात ५० खाटांचे विलगीकरण कक्ष सुरू केले आहे.
या बॅचचे आमदार मंगेश चव्हाण देखील विद्यार्थी असून त्यांनी देखील कक्ष स्थापनेत पुढाकार घेतला आहे.यावेळी उमेश पवार, तमाल देशमुख, सचिन आमले, खुशाल चव्हाण, चुडामण पाटील, मिलिंद पवार, डॉ. सुधीर देसले, धनंजय सोनवणे, विशाल सोनगिरे, उमेश महाजन व स्वप्निल राखुंडे यांच्या प्रयत्नातून हे सुसज्ज विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.अधिक माहिती घेता यावी यासाठी खालील संपर्क क्रमांकावर ७३९१०२६१८८, ९२२६७७१४७१, ९८३४६१८१३४, ८८३०४८३३६५, ९८२३३५५११८, ७५८८००७१८१८६६९०७३०८३, ९०२११३३७३७, ८८३०६४५२७६, ९८८१३३२६५६, ९९२२९०७२०७, ९६५७३१५७५७ संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.