टेकवाडे खुर्द शिवारात घटना
चाळीसगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यामध्ये काही गावांमध्ये बिबट्या जेरबंद केले असले तरी काही ठिकाणी अद्यापही इतर बिबट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. शुक्रवारी दि. ७ फेब्रुवारी रोजी पहाटे ३ ते ४ वाजेच्या सुमारास एका बिबट्याने टेकवाडे खुर्द शेत शिवारातील वासराचा फडशा पाडल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे.
दिगंबर भानुदास गोसावी (वय ३८, रा.टेकवाडे खुर्द ता. चाळीसगाव) या शेतकऱ्यांच्या शेत शिवारात ही घटना घडली आहे. त्यांचे शेत कजबे बहाळ ऋषींपांथा शिवारात गिरणा खोऱ्यात नाल्यालागत शेत आहे. त्यांच्या मालकीच्या गट नंबर ६०६ बहाळ शिवारातील शेतात शुक्रवारी सकाळी ते गेले असता त्यांना बिबट्याचे पावलांचे ठसे दिसले.(केसीएन) तसेच वासराचा फडशा पाडल्याचे दिसून आले.
या घटनेमुळे तालुक्यातील शेतकरी संतप्त झाले आहेत. वनविभागाकडून दुपारी पंचनामा करण्यात आला आहे. (केसीएन) या बिबट्यासोबत काही बछडे असल्याचे शेतकरी सांगत आहेत. बिबट्या बहाळ गुढे, बहाळ, जीवार्डी तसेच वाडे, गोंडगाव, नावरे या शिवारात सध्या अनेकांना दिसत आहे. गोंडगाव शिवारात ३ दिवसापूर्वी असल्याचं एका घटनेत २ वासरांना बिबट्याने कंठस्नान घातले. दरम्यान बिबट्याचा बंदोबस्त करावा, आमदार मंगेश चव्हाण यांनी या प्रकरणात लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशीही मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.