माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयाला दिले क्रीडा साहित्य भेट
चाळीसगाव (प्रतिनिधी) : शहरात नालंदा शाळेत तब्बल ३० वर्षांनी इयत्ता दहावीच्या १९९४-९५च्या मित्र-मैत्रिणींचे गेट-टुगेदर झाले. त्यात ३४ मित्र-मैत्रिणी हजर होते. अध्यक्ष म्हणून नालंदा शाळेचे सध्याचे मुख्याध्यापक रावते होते. तर प्रमुख आतिथी प्रमुख म्हणून म्हणून तत्कालीन व आता निवृत्त झालेले शिक्षक हे होते.
कार्यक्रमाची सुंदर संगीत रचना करण्याची जबाबदारी रवी खंडु निकम यांनी पार पाडली. या गेट टुगेदर कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्याची ओळख परिचय, तसेच अनेक मनोरजक खेळ, संगीत खुर्ची, डान्स, गाणे, गाण्यातील वस्तु ओळखणे असे नविन्यपुर्ण खेळ खेळले. या कार्यक्रमाची प्रस्तावना आशिष अहिरे यांनी केली. त्यांनी आजच्या काळात गेट टुगेदर का आवश्यक आहे या संदर्भात आपल्या प्रस्तावीकेत सांगीतले. तर माजी विद्यार्थ्यांमधून शितल देशमुख व रवी निकम यांनी मनोगत व्यक्त केले.
सेवानिवृत्त शिक्षकांमधून पी. पी.पगारे, माजी मुख्याध्यापक सोंमवंशी, डी.एल. चव्हाण यांनी विद्यार्थ्याना आजची वेगवान जीवन शैली व व्यायाम याचे महत्व विशद केले. तसेच अध्यक्षिय भाषणात मुख्यध्यापक रावते यांनी या शाळेत पहील्यादाच हा कार्यक्रम होतो आहे व याचा आम्हाला खरोखर अभिमान आहे असे नमुद केले. या कार्यक्रमातुन माजी विद्यार्थ्यानी शाळेला मुलांना खेळण्यासाठी क्रिडा साहित्य भेट म्हणुन दिले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राकेश पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माजी विद्यार्थीनी कविता कोकाटे व आशिष अहिरे यांनी केले. .
हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी माजी विद्यार्थी किशोर टकलै, डिंगबर पाटील, जावेद खाटीक, मनोज गागुर्डे, धरती पाटील, मंदाकिनी पाटील, गुलाब चौधरी, सुनंदा राठोड, पदमसिंह शिंदे, इम्रान मिर्झा, विकास माळी, नंदकिशोर सैंदाणे, संजय ह्याळीगै, रवीकिरण मोरे, रवी जोशी, शफी सय्यद, शरद अक्कर, सुमित्रा मिस्तरी, शालीनी सुर्यवंशी, जावेद सय्यद, सर्व १९९४-९५ च्या बॅचचे विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले.
००००००००००